मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध सामना पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडियाला खूप सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. टीम इंडियाने आता इंग्लंड विरूद्ध सीरिजसाठी तयारी सुरू केली आहे. प्लेइंग इलेव्हनसाठी आता तयारी सुरू झाली आहे. चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या एकूणच सर्व गोष्टी पाहता आता इंग्लंड सीरिज दरम्यान मोठा बदल करण्यात येऊ शकतो.
इंग्लंड सीरिजसाठी चेतेश्वर पुजाराची प्लेइंग इलेव्हनमधून सुट्टी करण्यात येऊ शकते. भारत विरुद्ध इंग्लंड 4 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सीरिजसाठी आता के एल राहुल आणि हनुमान विहारीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुजारा प्लेइंग इलेव्हनमधून आऊट केलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे.
पुजारापेक्षा तिसऱ्या क्रमांकावर के एल राहुल जास्त चांगला खेळू शकतो असा विश्वास मॅनेजमेंटला आहे. पुजाराने पहिल्या डावात 8 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करण्यात यश मिळालं. खराब कामगिरीमुळे पुजाराला इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये संधी दिली जाणार नाही अशी चर्चा आहे. टॉप ऑर्डरमध्ये टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध कमी पडली. ही कमी इंग्लंड सीरिजमध्ये भासू नये यासाठी आता प्लॅनिंग सुरू आहे.
पुजारापेक्षा हनुमान विहारी तीनपट उत्तम फलंदाज असल्याची चर्च आहे. टीम इंडियाचा विश्वासार्ह फलंदाज हनुमा विहारी अनेकदा टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणि बाहेर असतो. टीम इंडिया हनुमा विहारीला चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसर्या क्रमांकावर संधी देण्याचा विचार करू शकतो. 27 वर्षीय हनुमा विहारीने 12 कसोटी सामन्यांमध्ये 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म पाहता असे दिसते की त्याची कसोटी कारकीर्द आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.