IND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...

सौरभ तळेकर | Updated: Feb 18, 2024, 03:05 PM IST
IND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा! title=
IND vs ENG, Kuldeep Yadav, Shubman Gill

India vs England 3rd Test : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) द्विशतकीय खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडसमोर 557 धावांचं लक्ष ठेवलंय. टीम इंडियाच्या या विक्रमी आव्हानासमोर यशस्वीच नाही तर आणखी एका खेळाडूचं मोलाचं योगदान आहे. टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिलने (Shubman Gill) दुसऱ्या डावात धमाकेदार 91 धावांची खेळी केली. मात्र, एका चुकीमुळे त्याला शतक पूर्ण करता आलं नाही. 

झालं असं की, कालचा खेळ संपला तिथूनच शुभमन आणि नाईट वॉचमॅन म्हणून मैदानात आलेल्या कुलदीप यादवने डावाला सुरूवात केली. शुभमन गिलने मैदानात येताच डोळे जमवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूने कुलदीपने फायरिंग सुरू केली. कुलदीप आक्रमक फलंदाजी करत असताना 64 व्या ओव्हरमध्ये दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अचूक बसला नाही. एका बॉलवर लॉग ऑफवर शॉट खेळणाऱ्या कुलदीपने धाव घेण्याचा कॉल दिला. मात्र, समोर बेन स्टोक्स दिसताच त्याने शुभमनला रोखलं अन् परत जाण्याचा कॉल दिला. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. शुभमन नॉन स्टाईक एन्डपासून खूप पुढे आला होता.

आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र, तो फूटभर मागे राहिल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. रनआऊट झाल्यानंतर शुभमन मान खाली घालून मैदानात थांबला. शतक हुकल्याचं दु:ख शुभमनच्या चेहऱ्यावर दिसत होतं. परंतू, नेमकी चूक कोणाची? असा सवाल कायम राहिला आहे. 

नेमकी चूक कोणाची?

तसं पहायला गेलं तर, स्टाईकवर कुलदीप यादव होता अन् तो आक्रमक फलंदाजी करत होता. त्यामुळे स्टाईकवरील फलंदाजाचा कॉल महत्त्वाचा असतो. कुलदीपने कॉल दिल्याने शुभमन पळला. मात्र, कुलदीपने पुन्हा थांबण्याचा इशारा दिल्यावर शुभमनने पूर्ण प्रयत्न केले. अशातच चूक कुलदीपची होती, असं सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. शुभमनच्या ऐवजी कुलदीपने बाद व्हायला पाहिजे होतं, असं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.