न्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज, कोण जिंकणार?

टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी  284 धावांचे आव्हान मिळाले.

Updated: Nov 28, 2021, 05:11 PM IST
न्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज, कोण जिंकणार?

कानपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (ind vs nz 1st test) यांच्यात कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील  चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युतरात न्यूझीलंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 4 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 280 धावांची आवश्यकता आहे. (ind vs nz 1st test team India set a target of 284 runs for victory against New Zealand)

न्यूझीलंडला पहिल्या डावात 245 धावांवर ऑलआऊट केल्याने टीम  इंडियाकडे दुसऱ्या डावात 49 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने दुसरा डाव हा 7 बाद 234 धावावंर घोषित केला. यामुळे न्यूझीलंडला 284 धावांचे आव्हान मिळाले.

टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात पदार्पणवीर श्रेयस अय्यरने 65 धावांची खेळी केली. तर रिद्धीमान साहाने नाबाद 61 धावा केल्या. अक्षर पटेल यानेही नॉट आऊट 28 रन्स केल्या. अश्विनने 32 धावांच योगदान दिलं. न्यूझीलंडकडून दुसऱ्य डावात टीम साऊथी आणि कायले जेमीन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अझाज पटेलने 1 विकेट घेतली.

 

न्यूझीलंडचा दुसरा डाव

विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला अश्विनने तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला. अश्विनने विल यंगला 2 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. यानतंर 1 ओव्हरनंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपला. टॉम लॅथम आणि विल्यम सॉमरपविले नाबाद आहेत.

टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिला धक्का देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे.  त्यामुळे पाचव्या दिवशी टीम इंडियाला सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तर न्यूझीलंडसमोर भेदक गोलंदाजीचा सामना करण्याचा आव्हान असणार आहे.