IND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय, मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मागर्दर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत टीम इंडियाने हा कारनामा केला आहे.

Updated: Nov 21, 2021, 10:52 PM IST
IND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय, मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप  title=

कोलकाता : टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने किंवीवर क्लीन स्वीप मिळवला आहे. टीम इंडियाने या टी 20 मालिकेतील तिनही सामने जिंकले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मागर्दर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत टीम इंडियाने हा कारनामा केला आहे. (ind vs nz 3rd t20i team india beat vs new zealand by 73 runs and win series clean swip to new zealand at eden garden kolkata)

विजयासाठी  185 धावांचे आव्हान

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी  185 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 17.2 ओव्हरमध्ये 111 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्टीलने सर्वाधिक 51 धावांची खेळी व्यरिक्त टीम सायफर्टने 17 तर लॉकी फर्ग्यूसनने 14 धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.

गोलंदाजांचा भेदक मारा

टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर  दीपक चाहर, युजवेंद्र चहल आणि वेंकटेश अय्यरने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्या आधी  टीम इंडियाने टॉस जिंकून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने यामध्ये 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले. त्या व्यतिरिक्त इशान किशनने 29, श्रेयस अय्यरने 25, दीपक चाहरने नाबाद 21 तर व्यंकटेश अय्यरने 20 धावा केल्या. 

न्यूझीलंडकडन मिचेल सँटनरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट,  एडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन आणि इश सोढी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 

न्यूझीलंडला 2 वर्षात दुसऱ्यांदा क्लीन स्वीप

दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंडला 2 वर्षात दुसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंडला 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप दिला होता. टीम इंडिया जानेवारी 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. 

या दौऱ्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला त्यांच्याच देशात जाऊन त्यांना अस्मान दाखवलं होतं. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणारा पहिला संघ ठरला होता.  
 
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.

न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी , मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, लॉकी फर्गुयसन आणि ट्रेन्ट बोल्ट.