IND vs NZ: हा क्रिकेटपटू घेणार राहाणेची जागा, उपकर्णधार होण्याची मिळणार संधी?

 गेल्या काही सामन्यातील त्याचा खराब फॉर्म पाहता आता राहाणेल संघातून वगळण्याची शक्यता आणखी वाढली 

Updated: Nov 28, 2021, 01:39 PM IST
IND vs NZ: हा क्रिकेटपटू घेणार राहाणेची जागा, उपकर्णधार होण्याची मिळणार संधी? title=

मुंबई: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 2 सामन्यांची सीरिज सुरू आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये खेळवले जात आहे. टीम इंडियाची एकूण कामगिरी ही विशेष समाधानकारक नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहाणे यांची विशेष कामगिरी दिसली नाही. याउलट कसोटीत पदार्पण केल्यानंतर अय्यरने दमदार कामगिरी केली आहे. 

सर्व दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप झाले. या फलंदाजांमध्ये संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचेही नाव आहे. गेल्या काही सामन्यातील त्याचा खराब फॉर्म पाहता आता राहाणेल संघातून वगळण्याची शक्यता आणखी वाढली आहे.या सामन्यात विराट कोहलीच्या जागी कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेकडून संघासाठी सर्वोत्तम खेळाची अपेक्षा होती. अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरला. 

पहिल्या डावात केवळ 35 धावा करणारा रहाणे या डावात अवघ्या 15 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. रहाणे गेल्या काही काळापासून कसोटी सामन्यांमध्ये खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वात वाईट कामगिरी करणारा फलंदाज होता. राहाणेचं करियर धोक्यात आहे. आता राहाणेची जागा श्रेयस अय्यर घेणार का त्याला उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. 

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचं करियर धोक्यात येण्याची शक्यता आहे. यांची गेल्या तीन दौऱ्यांची कामगिरी पाहता त्यांना आता पुन्हा संधी देणार का? हा प्रश्न आहे. या दोन्ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियातून वगळं जाण्याची शक्यता आहे. तर राहाणे आणि पुजारा ऐवजी गिल आणि अय्यरला संधी दिली जाऊ शकते. 

टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी हे दोन बदल झाले तर राहाणे आणि पुजारासाठी हा धोक्याचा इशारा असणार आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये आता या दोघांनाही आपली चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नाहीतर यांचा पत्ता कट होऊ शकतो.