IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Updated: Jan 25, 2023, 06:02 PM IST
IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त title=

IND vs NZ T20 Series : टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. या क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची नजर टी20 मालिकेवर आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.खेळाडूच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठी चिंता सतावत आहे. 

 

हे ही वाचा : पाकिस्तानच्या माजी खेळाडूने हद्दच केली, म्हणतोय ''50 ओव्हरमध्ये मीच नंबर 1, माझ्यानंतर कोहली''

 

येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

कोण आहे 'हा' खेळाडू?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) दुखापत झाली आहे. ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यासाठी त्याने एनसीएमध्ये अहवाल दिला आहे. आणि त्याचे स्कॅन केले जात आहेत. ऋतुराजची ही दुखापत किती गंभीर आहेत, हे आता रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. मात्र या घटनेने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. दरम्यान गेल्या वर्षीही गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंका मालिकेतून बाहेर पडला होता. त्यावेळी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून त्याने संघात स्थान मिळवले होते. परंतु त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवता आले नाही.

टीम इंडियाकडे 'हे' पर्याय

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 135 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एका वनडे सामन्यात 19 धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. दरम्यान ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे त्याच्या बदलीची घोषणा करायची की नाही हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. कारण शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि ईशान किशन हे आधीच किवी संघाविरुद्ध सलामीसाठी उपस्थित आहेत. गिल आणि इशान किशन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम द्विशतके झळकावली आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे सलामीसाठी चांगले पर्याय आहेत. 

आता ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) पहिल्या टी20 सामन्यापुर्वी फीट होतो की अनफिटमुळे संघातून बाहेर पाडतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टीम इंडिया संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड (खेळताना सस्पेन्स), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.