IND vs NZ: हार्दिक आणि केनने चालवली 'क्रोकोडाईल सायकल', दोन कॅप्टनची समुद्रकिनाऱ्यावर धमाल; पाहा Video

IND vs NZ T20 Series: न्यूझीलंड दौऱ्यासाठी नवी कोरी टीम इंडिया हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळेल. तर वनडे मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे संघाची जबाबदारी खांद्यावर उचलणार आहे.

Updated: Nov 16, 2022, 11:29 PM IST
IND vs NZ: हार्दिक आणि केनने चालवली 'क्रोकोडाईल सायकल', दोन कॅप्टनची समुद्रकिनाऱ्यावर धमाल; पाहा Video title=
IND vs NZ T20 Series

Kane Williamson Hardik Pandya: टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर यंग टीम इंडिया (Team India) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला पोहोचली आहे. येत्या शुक्रवारपासून तीन T20 सामन्यांची मालिका (IND vs NZ T20 Series) सुरू होणार असल्याने क्रिडाप्रेमींमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली टीम इंडियाला तीन T-20 आणि आणि तीन एकदिवसीय सामने (IND vs NZ ODI) खेळणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी नवी कोरी टीम इंडिया हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळेल. तर वनडे मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे संघाची जबाबदारी खांद्यावर उचलणार आहे. त्याआधी दोन्ही संघाच्या कॅप्टनने फोटोशूट केला. त्यावेळी हार्दिक आणि केनने क्रोकोडाईल सायकल (crocodile bike) चालवल्याचं पहायला मिळालं.

आणखी वाचा - NZ vs IND : टीम इंडिया-न्यूझीलंडचे सामने टीव्हीवर दिसणार नाहीत?

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (Blackcaps) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवरून हार्दिक आणि विल्यमसनच्या बाईक राईडचा हा व्हिडिओ शेअर केलाय. क्रोकोडाईल बाईक ही एक खास प्रकारची बाईक (crocodile bike Video) आहे. ही एक प्रकारची दोन-सीटर सायकल आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना दोन दोन पँडल्स असतात आणि दोन्ही रायडर्स पँडल मारून सायकल चालवता येते.

पाहा Video -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

दरम्यान, शुबमन गिल, ईशान किशन,वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक अर्शदीप सिंह, हर्षल पटेल आणि दीपक हुड्डा या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलंय. त्यामुळे टीम इंडियाची यंगिस्तान न्यूझीलंडचा (IND vs NZ) पराभव करणार की नाही?, यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.