मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाची टी 20 मधील कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माला ती जबाबदारी सोपवण्यात आली. रोहित शर्मानेही बीसीसीआयचा त्याला कर्णधार करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. रोहितने आपल्या कॅप्ट्न्सीची झोकात सुरुवात केली. रोहितने कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्यावहिल्या टी मालिकेत न्यूझीलंडला टी 20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. कर्णधारपदाच्या जबाबदारीसह त्याने धमाकेदार खेळीही केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द सीरिज'चा पुरस्कार देण्यात आला. (ind vs nz t20i series 2021 team india captain rohit sharma overtake to afghanistan former captain Asghar Stanikzai about winning percentage)
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत रोहित शर्माने नियमित कर्णधार म्हणून 3-0 ने किवींनी क्लीन स्वीप दिला. यासह रोहितने कर्णधार म्हणून मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने याआधी विराटच्या अनुपस्थितीतही अनेकदा हंगामी कर्णधारपदही भूषवलं आहे.
रोहितने आतापर्यंत एकूण 22 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 18 सामन्यात त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर केवळ 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रोहितची विजयी टक्केवारी ही एकूण 81.81 इतकी आहे. रोहितने या विजयी टक्केवारीच्या बाबतीत अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणला पछाडलं आहे.
असगरची कर्णधार म्हणून असलेली विजयी टक्केवारी ही 81.73 इतकी आहे. आता रोहित टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या 10 देशांमधील सर्वात यशस्वी टी 20 कर्णधार झाला आहे.
रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि खेळाडूही आहे. रोहितने एक खेळाडू म्हणून 6 आयपीएल टायटल जिंकले आहेत. तर कर्णधार म्हणून त्याने मुंबईला 5 वेळा चॅम्पिनय केलं आहे. रोहितला 2013 मध्ये मुंबईचा कर्णधार करण्यात आलं होतं. त्याआधी तो हैदराबाद संघाचा सदस्य होता. हैदराबादने जेव्हा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं, तेव्हा रोहित त्या संघाचा सदस्य होता.