IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूला टीमबाहेर करणार रोहित शर्मा, कर्णधार घेणार मोठा निर्णय

Asia Cup 2023: पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Aug 31, 2023, 07:05 PM IST
IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूला टीमबाहेर करणार रोहित शर्मा, कर्णधार घेणार मोठा निर्णय title=

Asia Cup 2023: एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली असून 2 सप्टेंबर रोजी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चायनामन स्पिनर कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav ) स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अक्षर पटेलला संधी देणार कुलदीप यादवला प्लेईंग 11 मध्ये घेणार हा प्रश्न आहे.

कुलदीप यादवला मिळणार संधी?

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav ) अक्षर पटेलपेक्षा चांगला गोलंदाज असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल या दोघांपैकी एकाला संधी देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हन स्थान मिळण्याचं नक्की आहे. अशा स्थितीत रवींद्र जडेजाचा फिरकी जोडीदार कोण असेल, हे रोहित शर्माला निश्चित करायचं आहे. 

अक्षर पटेलने त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे कुलदीप यादव ( Kuldeep Yadav ) वर वर्चस्व गाजवलंय. कर्णधार रोहित शर्मालाही ( Rohit Sharma ) गोलंदाजीसोबत फलंदाजी करू शकणार्‍या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायला आवडेल. त्यामुळे पाकिस्तानविरूद्धच्या प्लेईंग 11 मध्ये अक्षरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) कोणाला बसवणार बाकावर?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) आणि रवींद्र जडेजा हे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील टॉप 7 खेळाडू मानले जातायत. आता अक्षर पटेल की कुलदीप यादव आठव्या क्रमांकावर खेळणार हे टीम मॅनेजमेंटला ठरवावं लागणार आहे. यामध्ये कदाचित रोहित शर्मा कुलदीप यादवला वगळण्याची शक्यता आहे. 

कशी असेल पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.