गडबड गडबड! रन घेण्याच्या गडबडीत केएल-पंत एकाच बाजूला, पुढे काय झालं?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 2nd Odi) यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एक भन्नाट प्रकार घडला.

Updated: Jan 21, 2022, 08:47 PM IST
गडबड गडबड! रन घेण्याच्या गडबडीत केएल-पंत एकाच बाजूला, पुढे काय झालं? title=

पार्ल | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 2nd Odi) यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एक भन्नाट प्रकार घडला. टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान हा सर्व प्रकार घडला. टीम इंडियाचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला उभे ठाकले. मात्र दोघांचं नशिब इतकं बलवत्तर की कोणीही आऊट झालं नाही. ज्या वेगाने टीम इंडियाच्या फलंदाजांकडून ही गडबड झाली. त्यापेक्षा जास्त गोंधळ हा आफ्रिकेच्या खेळाडूंचा झाला. त्यामुळे टीम इंडियाचे दोन्ही खेळाडू रनआऊट होण्यापासून वाचले. ( ind vs sa 2nd odi team india captain k l rahul and rishabh pant stand same end south africa missed chance to run out)

ही गडबड रिषभ पंत (Rishabh Pant) आणि कॅप्टन केएल राहुल (K L Rahul) यांच्यात झाली. सामन्यातील 14 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. तालमेळच्या अभावाने दोघेही एकाच ठिकाणी उभे ठाकले. मात्र यानंतर आफ्रिकेच्या खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही. खेळाडूंना रनआऊट करता आलं नाही. 

त्यानंतर नॉन स्ट्राईकवरुन (Non Strike End) स्ट्राईक एंडला (Strike End) धावून गेलेला केएल वेगाने नॉन स्ट्राईक एंडला धावून आला. टीम इंडियाचे दोन्ही फलंदाज रन आऊट होण्यापासून बचावल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा सर्व विनोदी प्रकार सामन्यातील 14 व्या ओव्हरमध्ये घडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे आव्हान

दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 287 धावा केल्या. टीम इंडियाकडून विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने महत्त्वाची नाबाद खेळी केली.

त्यामुळे आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करणार, की आफ्रिका सीरिज जिंकत नववर्षाची विजयी सुरुवात करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.