Ind vs Sa 3rd Odi : तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी

मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 11 ऑक्टोबरला (Ind vs Sa 3rd Odi)  दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये  खेळवण्यात येणार आहे.  

Updated: Oct 10, 2022, 07:15 PM IST
Ind vs Sa 3rd Odi : तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी title=

दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA Odi Series) यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.  टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला (Team India) मालिकेतील आव्हान कायम ठेवता आले. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 11 ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये  खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. दिल्लीत सातत्याने पाऊस होतोय. त्यामुळे दिल्लीत सामन्याच्या दिवशी पाऊस गेम करणार की काय, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. (ind vs sa 3rd odi at  arun jaitley stadium delhi know weather report rain forcast)

स्टेडियम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान

त्यामुळे स्टेडियम मॅनेजमेंटसमोर मैदान सुकं ठेवण्याचं आव्हान असणार आहे. मैदान खेळण्याजोगं बनवण्यासाठी उन आवश्यक आहे. मालिकेतील पहिला सामना हा लखनऊमध्ये खेळण्यात आला होता. तेव्हाही जोरदार पाऊस झाला होता. मात्र ग्राउंड अवघ्या काही वेळात सुखलं होतं.

दिल्लीत मंगळवारी पाऊस होण्याची शक्यता ही 40 टक्के इतकी आहे. त्यामुळे मैदान सुकवण्याची जबाबदारी ही डीडीसीए आणि अरुण जेटली स्टेडियमची असेल. त्यामुळे ग्राउंड स्टाफ आणि एकूणच मॅनेजमेंट हे आव्हान कसं पेलणार याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. 

मंगळवारी दिल्लीत पूर्णपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 61 टक्के आहे. म्हणजेच सूर्यप्रकाशाची अपेक्षा फारच कमी आहे. वाऱ्यांचा वेगही ताशी 20 किमी असेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

सीरिज कोण जिंकणार?

मालिका बरोबरीत असल्याने तिसरा सामना जिंकून मालिका कोण खिशात टाकणार, याबाबत क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र जर पाऊसाने गेम केला क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. यामुळे मालिकेचा निकाल लागणार की पाऊस गेम करणार, याकडे लक्ष असणार आहे. 

भारतीय टीम: शिखर धवन (कॅप्टन), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

साउथ अफ्रीका टीम: टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डीकॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा आणि तबरेज शम्सी.