IND vs SA 3rd Odi | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात 4 मोठे बदल होण्याची शक्यता

 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय (Ind vs Sa Odi Series) मालिकाही गमावली.  

Updated: Jan 22, 2022, 03:13 PM IST
IND vs SA 3rd Odi | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात 4 मोठे बदल होण्याची शक्यता title=

केपटाऊन : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय (Ind vs Sa Odi Series) मालिकाही गमावली. आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले. आफ्रिकेने पहिल्या सामन्यात 31 तर दुसऱ्या सामन्यात  7 विकेट्सने टीम इंडियावर विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया क्लिन स्वीप टाळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियात या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता आहे. (ind vs sa 3rd odi team india might be make 4 changes in playing 11 against south africa at capetown)

भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि व्येंकटेश अय्यर या चौघांना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळू शकतो.  या चौघांना या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही.

भुवनेश्वरला आफ्रिकेच्या गोलंदाजांना  रोखता आलं नाही. भुवनेश्वर त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. 

शिखर धवनकडून निराशा 

शिखर धवनने या मालिकेतून एकदिवसीय संघात पुनरागमन केलं. पहिल्या सामन्यात त्याने शानदार 79 धावा केल्या. तर दुसऱ्या वनडेत त्याने 29 धावांचं योगदान दिलं. धवनला दोन्ही सामन्यात अपेक्षित सुरुवात जरुर मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.

ओपनर बॅट्समनवर आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असते. यात धवन काहीसा अपयशी ठरला. त्यामुळे धवनला तिसऱ्या सामन्यातून वगळलं जाऊ शकतं. त्याच्या जागी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. 

मुंबईकर श्रेयस अय्यरलाही आपली छाप सोडता आली नाही. श्रेयसने दुसऱ्या सामन्यात 14 चेंडूत  11 धावांची खेळी केली. केएल राहुल-रिषभ पंत सेट जोडी आऊट झाली. त्यानंतर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी श्रेयसवर होती. मात्र अय्यर 14 धावा करुन तंबूत परतला.  

वेंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवला होता. मात्र तीच कामगिरी त्याला आफ्रिका विरुद्ध करता आली नाही. वेंकटेश बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाडीवर अपयशी  ठरला. त्यामुळे केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.