नवी दिल्ली : ६ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये ३ वनडे सामन्यात पराभवाचा सामना करणा-या साऊथ आफ्रिकेच्या टीमसाठी आनंदाची बातमी आहे.
दिग्गज खेळाडू एबी डि विलियर्स फिट झाला असून शिल्लक ३ वनडेसाठी घोषित टीममध्ये त्याला जागा मिळालीये. मात्र टीमच्या नेतृत्वात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डने तरूण फलंदाज मार्करम याच्यावर विश्वास दाखवत त्यालाच टीमचा कर्णधार ठेवलं आहे.
सीरीजच्या पहिल्या सामन्यात शतक लगावणारा कर्णधार फाफ डू प्लेसिस जखमी झाल्याने तो सीरिज खेळू शकत नाही. तर अनुभवी विकेटकीपर आणि ओपनर क्विंटन डी कॉक सुद्धा जखमी असल्याने बाहेर व्हावं लागलं होतं. तर वनडे सीरिज सुरू होण्याआधीपासून डि विलियर्सचं न खेळणं ठरलं होत. स्टार खेळाडू बाहेर असल्याने टीमला चांगलाच फटका बसला.
साऊथ आफ्रिका टीमने टेस्ट सीरिज २-१ ने जिंकली. पण वनडे सीरिजमध्ये सुरूवातीच्या तिनही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय टीमने सीरिजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. जर टीम इंडिया चौथा सामना जिंकले तर टीम इंडिया आयसीसीच्या वनडे रॅकिंगमध्ये नंबर वन बनतील. चौथा वनडे सामना १० फेब्रुवारीला जोहानिसबर्गला खेळला जाणार आहे.
साऊथ आफ्रिका टीम: एडिन मार्करम (कर्णधार), हाशिम अमला, एबी डि विलियर्स, जेपी ड्यूमिनी, इमरान ताहिर, डेविड मिलर, मोर्ने मोर्कल, क्रिस मॉरिस, लुंगी गिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खाया जोंडो, फरहान बेहरदीन.