IND vs SA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका मालिकेत कोरोनाची एन्ट्री, हा स्टार प्लेयर पॉझिटिव्ह

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेत कोरोनाची एन्ट्री झाली आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Updated: Jun 9, 2022, 09:12 PM IST
IND vs SA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका मालिकेत कोरोनाची एन्ट्री, हा स्टार प्लेयर पॉझिटिव्ह title=

नवी दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली. बीसीसीआयने या मालिकेत बायो-बबलचे निर्बंध शिथिल केले होते. मात्र बीसीसीआयचा हा निर्णय चुकीचा ठरला का, असा प्रश्न उपस्थित करण्याची स्थिती उद्भवली आहे. या मालिकेत कोरोनाची एन्ट्री झाली आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs sa t 20i series south africa aiden markram tested corona positive before 1st match against team india) 

दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला या पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉसवेळी याबाबतची माहिती दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची 2 जूनला कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा मार्करमची टेस्ट निगेटिव्ह आली. मार्करम पॉझिटिव्ह आल्याने ट्रिस्टन स्टब्सला पदार्पणाची संधी मिळाली.

बीसीसीआयचा तो निर्णय अतिघाईचा?

बीसीसीआयने या मालिकेसाठी बायो-बबलचे निर्बंध हटवले होते. मात्र आता बीसीसीआयचा हाच निर्णय मार्करम पॉझिटिव्ह आल्यानंतर  अतिघाईचा ठरला का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.