Jasprit Bumrah | टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहला जबर दुखापत, कसोटी मालिकेतून 'आऊट'?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे.   

Updated: Dec 28, 2021, 06:51 PM IST
Jasprit Bumrah | टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहला जबर दुखापत, कसोटी मालिकेतून 'आऊट'? title=

सेंचुरियन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना (India Vs South Africa 1st Test) खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) आता टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs sa test series india vs south africa 1st test day Jasprit Bumrah has suffered a right ankle sprain while bowling at SuperSport Park Centurion)   

नक्की काय झालं? 

बुमराहच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. बॉलिंग करताना ही दुखापत झाली आहे. बुमराह आफ्रिकेच्या पहिल्या डावातील   11 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर बुमराह बॉल टाकला. यावेळेस त्याचा पाय मुरगळला. बुमराह जमिनीवर पडला. 
 
बुमराहला या दुखापतीचा इतका त्रास झाला की त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांनी मैदानात धाव घेतली. पटेल यांनी मैदानाबाहेर घेऊन गेले. त्यानंतर पटेल यांनी बुमराहच्या घोट्याला पट्टी लावली.  

मेडिकल रिपोर्टकडे लक्ष

बुमराहला झालेल्या दुखापतीवर आवश्यक ते उपचार करण्यात आले आहेत. आता त्याचे रिपोर्ट काय येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान वैद्यकीय पथक बुमराहवर लक्ष ठेवून आहोत, असंही बीसीसीआयने नमूद केलं आहे.  

बुमराह कसोटी मालिकेला मुकणार?

 बुमराहला त्याच्या स्पेलमधील ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या ओव्हरच्या कोट्यातील उर्वरित एक चेंडू हा मोहम्मद सिराजला टाकावा लागला. त्यामुळे बुमराहला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अंतिम निर्णय हा मेडिकल रिपोर्टनंतरच घेण्यात येईल. 

बुमराहच्या जागी अय्यर

दरम्यान बुमराहला दुखापत झाल्याने त्याच्या जागी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.