IND vs SA Test Series | टीम इंडिया की दक्षिण आफ्रिका, कोण जिंकणार सीरिज? कसोटी मालिकेबद्दल मोठी भविष्यवाणी

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test Series) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ही एकूण 3 सामन्यांची मालिका आहे.  

Updated: Dec 26, 2021, 04:53 PM IST
IND vs SA Test Series | टीम इंडिया की दक्षिण आफ्रिका, कोण जिंकणार सीरिज?  कसोटी मालिकेबद्दल मोठी भविष्यवाणी title=

सेंचुरियन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test Series) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ही एकूण 3 सामन्यांची मालिका आहे. या मालिकेबाबात दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटचे भाग असलेले अली बाकर (Ali Bacher) यांनी भविष्यवाणी केली आहे. ही कसोटी मालिका कोणती टीम जिंकणार याबाबतचा त्यांनी भविष्यवाणी केली आहे. (ind vs sa test series team india vs south africa Ali Bacher prediction about test series winner)     

टीम इंडियाकडे गेल्या 30 वर्षांमधील सर्वोत्तम गोलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल, असं बाकर म्हणाले. 

अली बाकर काय म्हणाले? 

उभयसंघातील पहिला कसोटी सामना सेंचुरियनमध्ये (Centurion) खेळवण्यात येत आहे. "सेंचुरियन समुद्रसपाटीपासून 5 हजार फुट उंचावर आहे. तर जोहान्सबर्गमधील (Johannesburg)  वांडरर्स Wanderers) हे 6 हजार फुट उंचीवर आहे. दोन्ही सामने ज्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत, त्या खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत. या पीचमध्ये बाऊन्स आहे. ज्यामुळे गोलंदाजांना विकेट घेण्यात ही पीच मदतगार ठरेल", असं बाकर यांनी स्पष्ट केलं. 

टीम इंडियाकडे सर्वोत्तम पेसर 

"टीम इंडियाकडे गेल्या 30 वर्षांमधील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मालिका विजयाच्या दृष्टीने सुरुवात करेल", असंही बाकर यांनी नमूद केलं. टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि उमेश यादवसारखे भेदक गोलंदाज आहेत.    

टीम इंडियाला ऐतिहासिक कामिगिरीची संधी

टीम इंडियाला या कसोटी मालिकेच्या निमित्ताने ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. टीम इंडियाला आतापर्यंत आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला आपल्या नेतृत्वात हा किर्तीमान करण्याची सुवर्णसंधी आहे.