भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजआधी दिग्गज खेळाडू घेणार संन्यास?

हा दिग्गज खेळाडू संन्यास घेणार अशी चर्चा सुरू झाल्यानं क्रिकेट विश्वास मोठी खळबळ उडाली.

Updated: Jul 7, 2021, 08:59 PM IST
भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजआधी दिग्गज खेळाडू घेणार संन्यास?  title=

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज 13 जुलैपासून सुरू होत आहे. या सीरिजआधी श्रीलंका संघाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे दिग्गज क्रिकेटर एंजेलो मॅथ्यूज इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच यासंदर्भात तो घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. क्रिकेटपटू आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात करारावरून सुरू असलेल्या दीर्घ वादानंतर आता ही बातमी समोर येत आहे.

एंजेलो मॅथ्यूज घेणार संन्यास?

श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर एंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याचे संकेत देत आहे. भारत विरुद्ध 13 जुलैपासून वन डे सीरिज सुरू होत आहे. त्याआधीच जर त्याने संन्यास घेणार असं जाहीर केलं तर श्रीलंका क्रिकेट बोर्डसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

भारत विरुद्ध सीरिजआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डात खळबळ

सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वात जास्त अनुभवी म्हणून एंजेलो मॅथ्यूजकडे पाहिलं जातं. कसोटी कर्णधार दिमुथ करूणारत्नेला करारापासून श्रीलंका क्रिकेट बोर्डनं दूर ठेवलं आहे. तर मॅथ्यूजने श्रीलंका क्रिकेट बोर्डला एक पत्र लिहून कळवलं आहे की तो संन्यास घेण्याचा विचार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तो संन्यास घेण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डची चिंता वाढली आहे. 

कॉन्ट्रॅक्टवरून सुरू आहे वाद 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेटने प्रत्येक दौर्‍याच्या आधारावर कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. वार्षिक करार होणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानं खेळाडू नाराज आहेत. सध्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंशी करार करण्याची गरज आहे. खेळाडूंना 8 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ज्या खेळाडूंनी यापूर्वी स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता त्यांनी देखील आता स्वाक्षरी केली आहे. कामगिरीच्या जोरावर, 24 शीर्ष खेळाडूंना चार श्रेणींमध्ये करार देण्यात आले आहेत. सहा खेळाडूंना ए श्रेणीतील करार आहेत ज्यांचे वार्षिक पगार 70,000 ते एक लाख डॉलर्स दरम्यान असतील. श्रीलंकेचा संघ राष्ट्रीय करारावर स्वाक्षरी न करता इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला.