Rohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष

 रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही. 

Updated: Mar 8, 2022, 10:41 PM IST
Rohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  विराट कोहलीनंतर (Virat Kohli) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित कसोटी, वनडे आणि टी 20 टीमचा कर्णधार झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 12 मार्च रोजी बंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. (ind vs sl test series 2022 captain rohit sharma did not give chance to mohammed siraj kuldeep yadav)
 
या गोलंदाजाकडे दुर्लक्ष

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) शानदार फॉर्मात असतानाही रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत आणि पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी दिली नाही. सिराजमध्ये कोणत्याही पीचवर विकेट घेण्याची क्षमता आहे.

सिराजने नेहमीच डेथ ओव्हर्समध्ये आणि डावाच्या सुरुवातीला टीम इंडियाला विकेट्स मिळवून दिल्या आहेत.  मोहम्मदमध्ये निर्णायक क्षणी विकेट मिळवून देण्याची क्षमता आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत शानदार कामगिरी केली आहे. यानंतरही रोहितने त्याला खेळण्याची संधी देत ​​नाही.

विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात वेळोवेळी मोहम्मद सिराजवर विश्वास दाखवून संधी दिली अन् सिराजने त्याचा विश्वासही खरा ठरवला.  मात्र रोहितने सिराजला श्रींलका विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संधी दिली नव्हती. त्यामुळे रोहित विराटच्या खेळाडूकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय का, असंही म्हटलं जात आहे.  
 
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल. 

श्रीलंका टेस्ट टीम :  दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाठुम निस्संका, लाहिरू थिरिमाने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल मेंडिस (फिटनेस टेस्ट आवश्यक), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, चारिथ असलंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमार, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे आणि लसिथ एम्बुल्डेनिया.