close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

INDvsWI : वसीम जाफरचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच सध्या नॉर्थ साऊंडच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियममध्ये सुरू आहे.

Updated: Aug 23, 2019, 10:13 AM IST
INDvsWI : वसीम जाफरचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान एन्टिगामध्ये दोन मॅचच्या सीरिजमधली पहिली टेस्ट मॅच सुरू आहे. गुरुवारपासून या मॅचला सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी टीम इंडियानं सहा विकेट गमावत २०३ रन्स केले. अजिंक्य राहाणे (८१) टीमचा टॉप स्कोअरर ठरला. ही मॅच सुरू झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं टीम इंडियाच्या खेळाडूंना एक ओपन चॅलेंज दिलंय. 

मॅच सुरू झाल्यानंतर 'माझ्या रेकॉर्डची बरोबरी करून दाखवा' असं चॅलेंज वसीमनं टीम इंडियाच्या खेळाडूंना दिलंय. जाफरनं आपल्या टेस्ट करिअरमधली सर्वात मोठी खेळी याच एन्टिगामध्ये खेळली होती. त्यानं २००६ साली एन्टिगाच्या सेंट जोन्स स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये २१२ रन्स ठोकत एक रेकॉर्ड कायम केला होता. 

उल्लेखनीय म्हणजे, २००६ मध्ये खेळण्यात आलेल्या या टेस्ट मॅचमध्ये वसीम जाफर पहिल्या डावात केवळ एक रन काढण्यात यशस्वी झाला होता. परंतु, दुसऱ्या डावात ३९९ रन्सवर २१२ रन्स ठोकून त्यानं एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला होता. 

४१ वर्षीय वसीम जाफरनं आपल्या टेस्ट करिअरमध्ये ३१ मॅच खेळले. यामध्ये ३४.१० च्या सरासरीनं १९४४ रन्स केले.  

'मी २००६ मध्ये एन्टिगामध्ये २१२ रन्स केले होते. मला आठवतंय की त्या खेळीत एक सिस्करही ठोकला होता. एन्टिगामध्ये खेळल्या जाणाऱ्या या टेस्टमॅचमध्ये कुणी बरोबरी करू शकेल याची आशा आहे' असं ट्विट जाफरनं केलंय. 

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच सध्या नॉर्थ साऊंडच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियममध्ये सुरू आहे. या मैदानावर विराट कोहलीनं २०१६ मध्ये २०० रन्सची खेळी खेळलीय. हा या मैदानावरचा सर्वात मोठा स्कोअर आहे.