डकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते. 

Updated: Oct 7, 2017, 10:41 PM IST
डकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय title=

रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते. 

भारताने विजयासाठी ठेवलेले हे आव्हान एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना १८.४ षटकांत पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवावा लागला. अखेर डकवर्थ लुईसनुसार २० षटकांपैकी केवळ ६ षटके खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तत्पूर्वी, भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवला. ऑस्ट्रेलियाने १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलिया संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. सलामीवीर ८ धावा करुन बाद झाला. आरोन फिंचने एकाकी झुंज देताना ४२ धावा फटकावल्या त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शंभरीपार करता आली.

बाकी इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांनी केवळ एकेरी धावसंख्या उभारली. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीये.