एंटीगाः वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे. पाच मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं २-०नं आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये पहिले बॅटिंगला आलेल्या भारतानं ५० ओव्हर्समध्ये ४ विकेट गमावून २५१ रन्स बनवले. याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम ३८.१ ओव्हर्समध्ये १५८ रन्सवर ऑल आऊट झाली.
महेंद्रसिंग धोनीनं केलेल्या ७८ रन्स तसंच अजिंक्य रहाणे आणि केदार जाधवच्या योगदानामुळे भारताला २५१ रन्सपर्यंत मजल मारला आली. अजिंक्य रहाणेनं संयमी ७२ तर केदार जाधवनं २६ बॉल्समध्ये ४० रन्स केल्या. शेवटच्या १० ओव्हरमध्ये भारतानं एका विकेटच्या मोबदल्यात १०० रन्स केल्या. दुसरीकडे भारतीय बॉलर्सनीही उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा विजय सोपा केला. रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं.