INDvsENG TEST CRICKET : ​गुडघ्यातून रक्त वाहत होतं, पण तो गोलंदाजी करत राहिला

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या धैर्याचं चाहते कौतुक करत आहेत

Updated: Sep 2, 2021, 10:11 PM IST
INDvsENG TEST CRICKET : ​गुडघ्यातून रक्त वाहत होतं, पण तो गोलंदाजी करत राहिला  title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी (India-England Test Series) सामना आजपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक वेगळचं चित्र पाहिला मिळालं जे वाहून सगळेच स्तब्ध झाले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (james anderson) गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यातून रक्त वहात होतं, त्याची ट्राऊजर गुडघ्याजवळ रक्ताने माखली होती, पण तशाही परिस्थितीत तो खेळत राहिला. 

भारतीय डावाच्या 42 व्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी कर्णधार विराट कोहली (50 धावा) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (5 धावा) मैदानावर फलंदाजी करत होते. 

जेम्स अँडरसनला ही दुखापत कधी आणि कशी झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण जेम्स अँडरसन जखमी झाल्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते त्यानं दाखवलेल्या संयमाचं आणि धैर्याचं कौतुक करत आहेत.

क्षेत्ररक्षणादरम्यान अँडरसन गुडघ्यावर आपटला होता. ज्यामुळे त्याच्या गुडघ्याला मार लागला. यानंतर तो लंगडत असल्याचं कॅमेरात कैद झालं. काही वेळाने त्याने उपचारासाठी मैदान सोडलं. 

सामन्याच्या पहिल्या डावात अँडरसनने चौदा ओव्हर टाकत 41 धावा दिल्या आणि 1  विकेट घेतली. भारताच्या चेतेश्वर पुजाराला त्याने चार धावांवर बाद केलं.