भारत नेहमीच माझ्यासाठी खास, आणखी एका परदेशी खेळाडूची भारताला मदत

आणखी एक परदेश खेळाडू भारताच्या मदतीसाठी आला पुढे

Updated: May 4, 2021, 08:45 PM IST
भारत नेहमीच माझ्यासाठी खास, आणखी एका परदेशी खेळाडूची भारताला मदत title=

मुंबई : भारत सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. क्रीडा विश्वावरही कोरोनाचा परिणाम होत आहे. पुढील आदेश येईपर्यंत बीसीसीआयने आयपीएल 2021 (IPL 2021) पुढे ढकलले आहे. पण देश-विदेशातील खेळाडू कोरोना विषाणूंविरूद्धच्या युद्धात सतत भारताला मदत करत आहेत.

ब्रेट ली आणि पॅट कमिन्स या खेळाडूंच्या देणगीनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूने भारताला मदतीचा हात दिला आहे. जेसन बेहरेनडॉर्फ(Jason Behrendorff) असे या खेळाडूचे नाव आहे. कमिन्स प्रमाणेच बेरेनडॉर्फही युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोविड -19 क्रायसिस अपीलला देणगी देणार आहे. परंतु तो किती रक्कम देणार आहे याची माहिती त्याने दिली नाही.

ट्विटमध्ये जेसन बेहरेनडॉर्फ म्हणाला की, 'बहुतेक क्रिकेटर्सप्रमाणेच माझ्यासाठीही भारत नेहमीच खास स्थान आहे. हा एक सुंदर देश आहे आणि येथील लोक नेहमीच आपले स्वागत करतात आणि भारतात क्रिकेट खेळणे जगातील इतर कोणत्याही अनुभवापेक्षा वेगळे आहे. भारतात जे घडतंय ते खरोखर भयावह आणि वेदनादायक आहे.'

IPL 2021: Australia pacer Behrendorff 'absolutely pumped' to join CSK,  Sports News | wionews.com

तो म्हणाला की, 'भारतातील कोविड संकटासाठी युनिसेफ अभियानात मदत करण्यासाठी मला काहीतरी करायचे आहे. वर्षानुवर्षे भारताने मला आणि माझ्या कुटुंबाला दिलेले प्रेम आणि मैत्री यापेक्षा ते कमीच आहे. परंतु मला आशा आहे की मदतीमुळे काही फरक पडेल.'

आयपीएल 2021 कोरोनामुळे बीसीसीआय स्थगित केला आहे. कोरोना संकटात आयपीएल खेळवण्याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. आयपीएल -14 मधून खेळाडू सतत माघार घेत होते. अनेक खेळाडू या स्पर्धेच्या बाजुने नव्हते.'