IND vs AUS: ख्वाजाच्या शतकाने भारत बॅकफूटवर; Rohit Sharma ची 'ही' चूक टीम इंडियाला पडणार महागात

ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली फलंदाजी करत शतक झळकावलं. चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ 90 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 255 रन्स केले. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माची एक चूक टीम इंडियासाठी भारी पडू शकते.

Updated: Mar 9, 2023, 09:04 PM IST
IND vs AUS: ख्वाजाच्या शतकाने भारत बॅकफूटवर; Rohit Sharma ची 'ही' चूक टीम इंडियाला पडणार महागात title=

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येते. यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली फलंदाजी करत शतक झळकावलं. चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ 90 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 255 रन्स केले. 

ख्वाजा-स्मिथच्या जोडीने गोलंदाजांना धुतलं

कांगारूंचा ओपनर फलंदाज उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेडने एक चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 61 रन्सची खेळी केली. मात्र आर अश्विनने ही जोडी फोडली आणि हेडला माघारी धाडलं. अशातच पुढच्या 11 रन्समध्ये मार्नस लाबुशेनलाही डगआऊटमध्ये पाठवून दिलं. मात्र त्यानंतर स्मिथ आणि ख्वाजाच्या जोडीने जाव सावरला आणि भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. स्मिथची विकेट गेल्यानंतरही ख्वाजाने त्याचं शतक पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाचे सतत विकेट्स पडत होते मात्र तरीही ओपनर उस्मान ख्वाजा एका बाजूने उभा राहिला. स्मिथपाठोपाठ पीटर हँड्सकॉम्बही स्वस्तात पव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस उस्मान ख्वाजा नाबाद 104 रन्सवर खेळत असून त्याच्या सोबत कॅमेरून ग्रीन देखील 49 रन्सवर खेळतोय. 

रोहित शर्माची (Rohit Sharma) ही एक चूक पडणार भारी?

दरम्यान या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माची एक चूक टीम इंडियासाठी भारी पडू शकते. रोहितने मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन उमेश यादवला संधी दिली आहे. मात्र उमेश यादवला पहिल्या दिवसाच्या खेळात एकही विकेट मिळवता आलेली नाही. दरम्यान कर्णधाराचा हा निर्णय टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरू शकतो.

रोहित शर्माने घेतले हे मोठे निर्णय

अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या टेस्ट सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे आहे. चौथ्या टेस्टमधून पुन्हा एकदा के.एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचंही दिसून आलं.