केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या ६५ रन्सच्या आघाडीचा फारसा फायदा दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या इनिंगमध्ये उचलता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ १३० रन्सवर ऑल आऊट झाला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी २०८ रन्सची आवश्यकता आहे.
भारताकडून मोहम्मद शमी- जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २ विकेट घेण्यात यश आलं.
आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये २८६ रन्स केल्यानंतर भारताचा डाव २०९ रन्सवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ मात्र पावसामुळे रद्द झाला. चौथ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेनं ६५/२ अशी केली होती. दक्षिण आफ्रिकेचे २ खेळाडू शून्य रनवर आऊट झाले तर ४ खेळाडू एकेरी धावसंख्येवर आऊट झाले.