भारताचा सगळ्यात मोठा विजय, रोहितचेही २ विक्रमी रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेटनं शानदार विजय झाला.

Updated: Nov 1, 2018, 08:24 PM IST
भारताचा सगळ्यात मोठा विजय, रोहितचेही २ विक्रमी रेकॉर्ड title=

तिरुवनंतपुरम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेटनं शानदार विजय झाला. वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी १०४ रनचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं हे आव्हानं १४.५ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. या विजयाबरोबरच रोहित शर्मानं दोन मोठी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली आहेत. रोहित शर्मानं २०१८ साली वनडेमध्ये १ हजार रन पूर्ण केले आहेत. हा आकडा गाठण्यासाठी रोहितला या मॅचमध्ये ३३ रनची आवश्यकता होती. रोहितनं या मॅचमध्ये ६३ रन केले.

२०१८ साली रोहितनं वनडेमध्ये १०३० रन केले आहेत. रोहितशिवाय २ खेळाडूंना वनडेमध्ये एक हजार रनचा टप्पा गाठता आला. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं यावर्षी १२०२ रन केले. या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (१०२५ रन) यानंही हा टप्पा ओलांडला. रोहितनं तिसऱ्यांदा एका वर्षात १ हजार रन पूर्ण करण्याचं रेकॉर्ड केलंय. याआधी त्यानं २०१३ आणि २०१७ साली १ हजार रन केल्या होत्या.

रोहितनं मॅक्कलमचं रेकॉर्ड मोडलं

रोहित शर्मानं या मॅचमध्ये ३ सिक्स मारले. याचबरोबर त्यानं सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या खेळाडूंच्या यादीतील ब्रॅण्डन मॅक्कलमला मागे टाकलं. रोहितनं १९३ मॅचमध्ये २०१ सिक्स मारले आहेत. मॅक्कलमनं २६० मॅचमध्ये २०० सिक्स मारले होते. सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीनं ३९८ मॅचमध्ये ३५१ सिक्स मारले आहेत. क्रिस गेलनं २७५ सिक्स, सनथ जयसूर्यानं २७० सिक्स, धोनीनं २१८ सिक्स आणि एबी डिव्हिलियर्सनं २०१ सिक्स मारले आहेत.

भारताचा दुसरा मोठा विजय

भारतानं ही मॅच १४.५ ओव्हरमध्ये जिंकली. भारत मॅच जिंकला तेव्हा इनिंगचे २११ बॉल बाकी होते. एवढे बॉल बाकी असताना मिळवलेला हा भारताचा दुसरा मोठा विजय आहे. २००१ साली केनियाविरुद्ध भारतानं २३१ बॉल राखून विजय मिळवला होता. त्या मॅचमध्ये केनियाची टीम ९१ रनवर ऑल आऊट झाली होती. भारतानं ते आव्हान ११.३ ओव्हरमध्येच पूर्ण केलं होतं. टेस्ट खेळणाऱ्या देशांची यादी बघितली तर भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे.