पहिल्या टी-२०मध्ये भारताची बॅटिंग, मुंबईकर शिवम दुबेचं पदार्पण

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकला आहे.

Updated: Nov 3, 2019, 06:56 PM IST
पहिल्या टी-२०मध्ये भारताची बॅटिंग, मुंबईकर शिवम दुबेचं पदार्पण title=

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकला आहे. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आम्ही टॉस जिंकला असता तर आम्हीही पहिले बॉलिंगच घेतली असती, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये धुक्यामुळे बॉल पकडायला अडचण येऊ शकते, तसंच आमचं आव्हानाचा पाठलाग करतानाचं रेकॉर्ड चांगलं आहे, असं भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबेने पदार्पण केलं आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिवम दुबेला टीम इंडियाची टोपी देऊन शुभेच्छा दिल्या. आम्ही तीन स्पिनर आणि दोन फास्ट बॉलर घेऊन खेळत आहोत. तसंच शिवम दुबे हा मधल्या काही ओव्हरमध्ये आम्हाला पर्याय देऊ शकतो, असं रोहित टॉसवेळी म्हणाला.

दिल्लीतल्या प्रदुषणामुळे या मॅचवर संकंट ओढावलं होतं. तसंच मॅच खेळवली जाणार का नाही? याबाबतही शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्न उपस्थित केले जात होते. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही दिल्लीमध्ये प्रदुषणामुळे मॅच खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. पण बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र दिल्लीत मॅच खेळवण्यावर ठाम राहिला.

भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, दीपक चहर, के खलील अहमद

बांगलादेशची टीम

लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद नईम, मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह (कर्णधार), अफीफ हुसेन, मोसादेक हुसेन, अमिनुल इस्लाम, शैफूल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान, अल-अमिन हुसैन