Ind vs Eng T20: मालिकेत टीम इंडियाचा विजय, हा गोलंदाज ठरला गेम चेंजर

 भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात देत पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी खिशात घातली.

Updated: Mar 21, 2021, 08:39 AM IST
Ind vs Eng T20: मालिकेत टीम इंडियाचा विजय, हा गोलंदाज ठरला गेम चेंजर title=

मुंबई: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड अतिशय रंगतदार झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात देत पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी खिशात घातली.

 इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतानेही इंग्लंडच्या निर्णयाचे स्वागत करत इंग्लंडसमोर 224 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अर्धशतके आणि सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीमुळे भारताला दोनशेपार पोहोचता आले. 

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने जोस बटलर आणि डेव्हि़ड मलान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कडवा संघर्ष केला. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे  इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद  188  धावांपर्यंतच पोहोचता आले.

भुवनेश्वर कुमार ठरला गेम चेंजर
भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला इंग्लंडला 13 व्या षटकात हार्दिक पांड्याच्या हाती पाचव्या चेंडूवर कॅच आऊट केलं. या विकेटने सामन्याचा नकाशाच बदलला. जोस बटलरसारखा धोकादायक फलंदाज क्रीजवर असता तर इंग्लंडने हा सामना आणि मालिका जिंकली अगदी सहज जिंकली असती. हा धोका दूर करण्यात पांड्या आणि भुवीला यश मिळालं. 

13 व्या ओवरमध्ये भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीसाठी उतरण्याचा सल्ला दिला आणि तो यशस्वी ठरला. एकामागोमाग एक 5 गडी बाद करण्यात भुवीला यश मिळालं. इंग्लंड संघाच्या हाती अपयश आलं.

जो बटलर आऊट झाल्यानंतर इंग्लंड संघातील खेळाडूंचं मनोधैर्य खालावलं. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. इंग्लंड संघाला 20 षटकांत केवळ 188 धावांवर थोपवून धरण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर विजय मिळवल्यानंतर आता हा पुन्हा टी 20वर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर आता पुढे वन डे सीरिज खिशात घालण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य आहे.