इंग्लंड : IND vs ENG: रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा हा T20 सामन्यांमध्ये सलग 13 वा विजय आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने अप्रतिम खेळ केला. त्याने आपल्या खेळाच्या जोरावर क्रीडा रसिकांची मने जिंकली. या सामन्यात हार्दिकने अनोखा विक्रम केला.
रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो फलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. हार्दिक पांड्या यानेही या सामन्यात 51 धावांची खेळी केली ज्यात 6 चौकार आणि 1 षटकार होता. त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याचे हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे. त्याच्यामुळे भारताने इंग्लंडला मोठे टार्गेट देता आले.
हार्दिक पांड्या याने फलंदाजीसोबत गोलंदाजीत आपली चमक दाखवली. त्याने चार षटकांत 33 धावा देत 4 बळी घेतले. हार्दिकने पहिल्याच षटकात लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मलान यांची विकेट घेतली. त्याने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. हार्दिकच्या गुगलीने इंग्लंडचे फलंदाज लवकर बाद झालेत.
एका सामन्यात अर्धशतक आणि चार विकेट घेणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी युवराज सिंग याने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 60 धावा देऊन 3 बळी घेतले होते. हार्दिक पांड्या शानदार फॉर्ममध्ये दिसून येत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला केवळ 148 धावा करता आल्या आणि भारताने 50 धावांनी हा सामना जिंकला. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने 51 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.