मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 रन्सने पराभव केला. 199 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड टीम 19.3 ओव्हरमध्ये केवळ 148 रन्स करू शकली. यावेळी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला हार्दिक पांड्या ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची टीमने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. त्यानंतर लक्ष्य गाठणं कठीण झालं. मोईन अलीने सर्वाधिक 36 आणि हॅरी ब्रूकने 28 रन्स केले. तर ख्रिस जॉर्डन 26 रन्सवर नाबाद राहिला. 148 रन्सवर इंग्लंडची टीम गारद झाली.
भारताकडून हार्दिक पांड्याने उत्तम गोलंदाजी करत 33 रन्समध्ये चार बळी घेतले. युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी दोन विकेट्स पटकावले.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने केवळ 14 बॉलमध्ये 5 चौकारांसह 24 रन्स केले. भारतीय कर्णधाराला मोईन अलीने डावाच्या तिसऱ्या षटकात बाद केला.
रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी दमदार फलंदाजी पहायला मिळाली. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 39 तर दीपक हुडाने 17 बॉल्समध्ये 33 रन्स केले.
यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिलं अर्धशतक झळकावले. हार्दिकने 33 बॉल्समध्ये 51 रन्स केले. यानंतर टीम इंडिया शेवटच्या पाच ओव्हरमध्ये फक्त 41 रन्स करू शकली.