India vs Ireland: दक्षिण आफ्रिकेत ICC महिला T20 वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट सुरु आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेत काल (19 फेब्रुवारी) इंग्लंडने (Ind vs Eng) भारताचा 11 धावांनी पराभव झाला. परिणामी ब गटात भारतीय संघाला विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. या स्पर्धेतील टीम इंडियाचा (team India) हा पहिलाच पराभव आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरचे 5 बळी आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाच्या 52 धावा टीम इंडियाच्या कामी आल्या नाहीत. मात्र आयर्लंडविरुद्ध भारत या स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
भारतीय संघाला आता ग्रुप स्टेजमधील शेवटचा आणि चौथा सामना आज, 20 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. तर इंग्लंडला शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानचेही दोन सामने बाकी असून त्यांचे सध्या 5 गुण आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरीत कोणाला स्थान मिळेल हे सांगता येत नाही. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड संघ 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. परिणामी आज (20 फेब्रुवारी 2023) होणाऱ्या आयर्लंडविरुद्ध भारत या स्पर्धेत हा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. या पराभवामुळे आता उपांत्य फेरी गाठण्याच्या भारतीय संघाच्या आशाही मावळल्या आहेत.
वाचा: वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 10 वर्षानंतर 'हा' खेळाडू करणार कमबॅक
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे 3 सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. या परिस्थितीत भारताच्या फलंदाजांची महत्त्वाची भूमिका असेल. कर्णधार हरमनप्रीत आणि शफाली वर्मा यांना अजून गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही. तसेच भारताकडून केवळ युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. जेमिमा रॉड्रिग्ज पहिल्या सामन्यानंतर अपयशी ठरली आहे.
उपकर्णधार स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्ध अर्धशतक साकारले. आता आयर्लंडविरुद्ध पुन्हा स्मृतीकडून आक्रमक खेळीची संघाला अपेक्षा असेल. गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर आणि दीप्ती शर्मा वगळता भारतीय गोलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. या दोघींना पूजा वस्त्रकार आणि राधा यादव यांची साथ मिळणे गरजेचे आहे.