शार्दूल ठाकूर टीमबाहेर का? पाकिस्तानविरूद्धच्या पराभवानंतर भारताला सतावतायत 'हे' प्रश्न

पाकिस्तानने भारतावर मात करत इतिहास रचलाय.

Updated: Oct 25, 2021, 08:24 AM IST
शार्दूल ठाकूर टीमबाहेर का? पाकिस्तानविरूद्धच्या पराभवानंतर भारताला सतावतायत 'हे' प्रश्न title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये अखेर काल भारत विरूद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगला. आणि या हाय व्होल्टेज सामन्याचा झटका यंदा टीम इंडियाला लागला. पाकिस्तानने भारतावर मात करत इतिहास रचलाय. टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. 

वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानशी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतात, या पराभवाला कोण जबाबदार आहे. कोणते प्रश्न आहेत ज्यामुळे भारताला अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

रविचंद्रन अश्विनला का ठेवलं बाहेर?

चार वर्षांनंतर टी -20 संघात पुनरागमन करणारा रविचंद्रन अश्विन याला पाकिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली नाही. दोन्ही सराव सामन्यांमध्ये अश्विनने चांगली गोलंदाजी केली. जरी त्याने विकेट्स कमी घेतले असले तरी त्याने फलंदाजांना अधिक रन करण्यासापासून रोखलं होतं. पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठा होता, दबावही जास्त होता. त्यामुळे वरुण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनला खेळवता आलं असतं.

आईपीएलमध्ये वरुण चक्रवर्तीने चांगली गोलंदाजी केली. पण हा मोठा मुकाबला पूर्णतः फेल झाला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांनी त्यावर अटॅक केला. त्यामुळे या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये कुठेतरी रविचंद्रन अश्विनची कमी जाणवली.

टीम इंडियाचा सहावा बॉलर कुठे होता?

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला. पण पाचही गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले. अशा स्थितीत टीम इंडियाला अजून एक मोठा संकट उभं होतं, एखाद्या गोलंदाजाला मारहाण होत असेल, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या कुणालाही गोलंदाजी देता येणार नाही. म्हणजेच सहाव्या गोलंदाजाची उणीव नक्कीच जाणवली, कारण हार्दिक पांड्याला गोलंदाजी करू शकत नव्हता.

शार्दूल ठाकूरला संघात का संधी दिली नाही?

अशा परिस्थितीत अजून एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं असतं मात्र त्याला संधी का दिली गेली नाही. कारण जर एखाद्या मुख्य गोलंदाजाला खेळ चांगला होत नसेल तर त्याला कव्हर करण्यासाठी कोणीतरी असणं देखील आवश्यक होतं.

मिडल ऑर्डरमध्ये वेगाने रन्स कोण बनवणार?

पाकिस्तानसमोर भारताची सलामी अपयशी ठरली. केएल राहुल आणि रोहित शर्मा यावेळी मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत, त्यामुळे जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि उर्वरित मधल्या फळीतील फलंदाजांवर आली. विराटने काही प्रमाणात ही जबाबदारी स्विकारली मात्र त्याची साथ देण्यासाठी इतर कोणी काळ टिकू शकलं नाही.

सूर्यकुमार यादव, ज्याने टी -20 संघात आपले स्थान पक्कं केलं होतं, तो या ठिकाणी अपयशी ठरला. नंतर जेव्हा ऋषभ पंत आला, तेव्हा त्याच्याकडे विराट कोहलीसोबत भागीदारीची जबाबदारी होती. पण पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या आले, त्यांनाही मोठी धावसंख्या करता आली नाही. 

प्लेइंग 11मध्ये बदल करणार का भारत?

भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. तर आता पुन्हा प्रश्न असा आहे की, विराट कोहली प्लेइंग-11 मध्ये बदल करणार की त्याच टीमसोबत मैदानात उतरणार? हार्दिक पांड्या खेळू शकला नाही तर त्याची जागा कोणीतरी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत तो खेळाडू, इशान किशन म्हणून फलंदाज किंवा शार्दुलसारखा वेगवान गोलंदाज कोण असेल. तसेच रविचंद्रन अश्विन परतणार का? हे पण प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहेत.