टीम इंडियाचा पहाडी स्कोअर, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Updated: Oct 11, 2019, 05:58 PM IST
टीम इंडियाचा पहाडी स्कोअर, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के title=

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. ६०१/५ या स्कोअरवर भारताने डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहली २५४ रनवर नाबाद राहिला. तर रवींद्र जडेजा ९१ रनवर आऊट झाला. जडेजाची विकेट गेल्यानंतर भारताने लगेचच डाव घोषित केला. यानंतर बॉलिंगला आलेल्या भारतीय बॉलरनी सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला ३ धक्के दिले. दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ३६/३ असा आहे. उमेश यादवने २ तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली आहे. दक्षिण आफ्रिका अजूनही ५६५ रननी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने २७३/३ अशी केली होती. यानंतर अजिंक्य रहाणे ५९ रन करून आऊट झाला. पहिल्या दिवशी मयंक अग्रवालने १०८ रनची शतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर केशव महाराज आणि मुथ्थुस्वामीला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं ते ७वं द्विशतक होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये ७ द्विशतकं करणारा विराट हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये ६ द्विशतकं केली होती. 

विराटचा विक्रम; ७ द्विशतकं करणारा पहिला भारतीय