India vs Sri lanka: पहिल्या दोन सामन्यात दणक्यात विजय नोंदवल्यानंतर, भारत आणि श्रीलंका (IND vs SL, 3rd ODI) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय नोंदवून श्रीलंकेला क्लिन स्वीप करण्याचं स्वप्न कॅप्टन रोहित शर्मा पाहतोय. अशातच आता तिसऱ्या एकदिवसीय (India vs Sri lanka) सामन्यात कॅप्टन रोहितसाठी (Rohit Sharma) डोकेदुखी ठरणाऱ्या एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून (Playing 11) डच्चू मिळण्याची शक्यता आहे. (india vs sri lanka 3rd odi match shubman gill flop show rohit sharma make big change ishan kishan may get in latest sports news)
कर्णधार रोहित शर्मा सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळून त्याच्या जागी ईशान किशनला (Ishaan Kishan) संधी देऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल सलामीला काही खास करू शकला नाही आणि केवळ 21 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर शुभमन ट्रोल देखील झाला होता. त्यामुळे शुभमनवर पुन्हा विश्वास दाखवला जाणार की नाही?, असा सवाल विचारला जातोय.
एकीकडे डबल सेंच्युरी (Ishaan Kishan Double century) ठोकणारा ईशान किशन टीम इंडियासाठी वॉटर बॉयचं काम करतोय. मात्र, त्याला संधी दिली जात नाही. त्यामुळे फॅन्समध्ये नाराजीचं वातावरण आहे. मागील पाच सामन्यात ईशानने धुंवाधार फलंदाजी केली आहे. तरीही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नाही. त्यामुळे टीम इंडियावर (Team India) टीका होताना दिसत आहे.
आणखी वाचा - Ind vs SL : टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी, रोहित शर्मा ट्रम्प कार्ड मैदानात उतरवणार!
दरम्यान, शुभमन गिलला टेस्टमध्ये वारंवार संधी देण्यात येते. तसेच त्याला वनडेमध्ये देखील सात्त्याने खेळवलं जातंय. त्यामुळे आता रोहित शर्मा सलामीवीर म्हणून वारसदार शोधतोय का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. 22 ऑगस्ट 2022 रोजी झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलच्या बॅटने वनडेतील पहिले आणि शेवटचं शतक झळकलं होतं. तेव्हापासून शुभमन गिल वनडेत शतकासाठी आसुसलेला आहे.
LIVE|
IND
52/0(4.5 ov)
|
VS |
AUS
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.