close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पहिल्या टेस्टमध्ये रोहितला संधी नाही?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Aug 22, 2019, 05:32 PM IST
पहिल्या टेस्टमध्ये रोहितला संधी नाही?

एंटिगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेली टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या दौऱ्यात भारताने टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला. आता टेस्ट सीरिजही खिशात टाकण्याचा विराटच्या टीमचा प्रयत्न असेल. याच टेस्ट सीरिजपासून भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोहली, पुजारा, बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना सोडलं, तर प्रत्येक स्थानासाठी एकापेक्षा जास्त दावेदार आहेत. याचकारणामुळे रोहितला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. रोहित शर्मा हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने ५ शतकं करण्याचा विश्वविक्रम केला.

ओपनिंगसाठी टीम इंडियाकडे केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांचा पर्याय आहे. हनुमा विहारी हा मधल्या फळीतला बॅट्समन आहे, पण ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्टमध्ये त्याने ओपनिंगला बॅटिंग केली होती. विहारी एक उपयुक्त बॉलरही आहे, त्यामुळे टीम जर ३ बॉलर घेऊन खेळत असेल, तर विहारी बॉलिंगमध्येही कामाला येऊ शकतो. पण या मॅचमध्ये मयंक अग्रवाल आणि केएल राहुलचं ओपनिंगला येतील, ही शक्यता अधिक आहे.

तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचं खेळणं निश्चित आहे. पण पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे हा प्रबळ दावेदार आहे. सहाव्या क्रमांकावर स्पेशलिस्ट बॅट्समन खेळवण्याचा निर्णय टीमने घेतला तर रोहित आणि हनुमा विहारी यांच्यात स्पर्धा असेल. हनुमा विहारीला त्याच्या उपयोगी बॉलिंगमुळे संधी मिळणार का विराट रोहितवर विश्वास दाखवणार? हे थो़ड्याच वेळात कळेल.

टीमने ५ बॅट्समन, एक कीपर आणि ५ बॉलर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला, तर मात्र रोहित आणि हनुमा विहारी या दोघांना बाहेर बसावं लागू शकतं. विकेट कीपर म्हणून भारताकडे ऋषभ पंत आणि ऋद्धीमान सहा हे दोन पर्याय आहेत. तर फास्ट बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव आहेत. स्पिनरच्या जागेसाठी आर. अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यात स्पर्धा आहे.

भारतीय टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान सहा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, आर. अश्विन, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा