'मी IPL मध्ये पाच ट्रॉफी उगाच जिंकलेलो नाही', रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला 'आता मी अजिबात...'

Rohit Shamra on IPL: 29 जूनला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीनंतर (MS Dhoni) ही कामगिरी करणारा तो दुसरा कर्णधार ठरला. यासह भारताने तब्बल 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकत दुष्काळ संपवला.   

शिवराज यादव | Updated: Aug 22, 2024, 06:40 PM IST
'मी IPL मध्ये पाच ट्रॉफी उगाच जिंकलेलो नाही', रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला 'आता मी अजिबात...' title=

Rohit Shamra on IPL Trophies: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपच्या विजयाचं श्रेय भारतीय संघाच्या तीन आधारस्तंभांना दिलं आहे. हे तीन आधारस्तंभ म्हणजे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आहेत. टी-20 वर्ल्डकप जिंकत भारताने तब्बल 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकत दुष्काळ संपवला. दरम्यान रोहित शर्माने आगामी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये विजयाचा निर्धार केला आहे. 

29 जूनला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंतर (MS Dhoni) ही कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. बुधवारी रोहित शर्माला CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं. यावेली त्याने टी-20 मधील विजयाचं श्रेय राहुल द्रविड, अजित आगरकर आणि जय शाह यांना दिलं. 2023 एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने यशस्वीपणे ही स्पर्धा जिंकत ती निराशा मिटवली. 

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "या संघात बदल घडवून आणणे आणि आकडेवारी, निकालांची फारशी चिंता न करणे, तसंच असं वातावरण तयार करणं जिथे लोक जास्त विचार न करता मुक्तपणे खेळू शकतील हे माझं स्वप्न होतं. याचीच नेमकी गरज होती. मला माझ्या तीन आधारस्तंभांकडून फार मदत मिळाली. ज्यामध्ये जय शाह, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांचा समावेश आहे. मी जे केलं ते करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तसंच खेळाडूंना विसरू नका, जे वेगवेगळ्या वेळी आले आणि आम्ही जे साध्य केले ते साध्य करण्यात संघाला मदत केली”. 

'मी 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्यामागे कारण'

टी-20 वर्ल्डकपनंतर आता भारतीय संघाचं लक्ष चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपकडे आहे. 2025 मध्ये दोन्ही स्पर्धा होणार आहेत. रोहितने यावेळी आपली ट्रॉफी जिंकण्याची भूक अद्याप मिटली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तो म्हणाला की, "मी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यामागे कारण आहे. मी आता थांबणार नाही. कारण एकदा तुम्हाला सामने, ट्रॉफी जिंकण्याची सवय लागली की तुम्हाला थांबावंसं वाटत नाही. आम्ही संघ म्हणून पूर्ण प्रयत्न करु. आम्ही भविष्यात चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहू".

"आता आमचे काही आव्हानात्मक दौरे होणार आहेत. आमच्यासाठी हे कधीच थांबत नाही. जेव्हा तुम्ही यश मिळवता तेव्हा ते आणखी मिळावं यासाठी प्रयत्न सुरु राहतात,"असं रोहित म्हणाला. 

पुढे त्याने सांगितलं की, "मीदेखील हेच करणार आहे. माझे सहकारी खेळाडूही असाच विचार करत असतील याची मला खात्री आहे. मी गेल्या दोन वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये जे पाहिलं आहे, त्यांच्यात नवा उत्साह आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे".