close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सैन्यदलाच्या सेवेतून परतलेला धोनी करतोय 'हे' काम

क्रिकेटच्या मैदानापासून जवळपास दोन महिने दूर राहिल्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा खऱ्या अर्थाने त्याच्या दैनंदिन जीवनात परतला आहे. 

Updated: Aug 22, 2019, 01:40 PM IST
सैन्यदलाच्या सेवेतून परतलेला धोनी करतोय 'हे' काम
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : क्रिकेटच्या मैदानापासून जवळपास दोन महिने दूर राहिल्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा खऱ्या अर्थाने त्याच्या दैनंदिन जीवनात परतला आहे. दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या माहिने या काळात सैन्यदलाच्या सेवेत त्याचं योगदान दिलं. सैन्याची शिस्त, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा या मुल्यांचं अवलोकन करत धोनीने त्याची ही जबाबदारी प्रशंसनीयरित्या पार पाडली. 

सैन्यदलाच्या सेवेतून परतणाऱ्या धोनीने पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन आयुष्याकडे मोर्चा वळवला आहे. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासोबतच त्याने आणखी एका महत्त्वाच्या कामालाही वेळ दिला आहे. हे काम म्हणजे जाहिराती आणि इतर विविध कारणांनी करण्यात येणाऱ्या चित्रीकरणांचं, फोटोशूटचं. 

नुकतच मुंबईतील मेहबूब स्टुडिओ येथे माहिने एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी हजेरी लावली होती. यावेळी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासुद्धा धोनीसोबत होती. त्याची हेअरस्टायलिस्ट सपना मोती भवनानी हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती धोनीच्या लूकमध्ये काही बदल कराताना दिसत आहे. 

@msdhonifansofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही एक व्हि़डिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये धोनीची नवी हेअरस्टाईल साकारली जात असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. माहिचा हा एकंदर अंदाज पाहता येत्या काळात तो नेमका कोणत्या नव्या जाहिरातीतून आणि झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचा लूकह पाहण्यासाठीही क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता आहे.