मुंबई : भारतीय क्रिकेटपटू प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्यांच्याकडे प्रसिद्धी, धनदौलतीची काहीच कमतरता नसते. अशी अनेक उदाहरणंही आहेत.पण, तुम्हाला माहितीये का, क्रिकेटमध्ये नाव कमवणारे हे खेळाडू शिक्षणाच्या बाबती मात्र काहीसे मागे आहेत. असं असलं तरीही त्यांच्या पत्नी मात्र शिक्षणाच्या बाबतीत चांगल्याच अग्रेसर असल्याचं दिसत आहे.
भारतीय संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याची पत्नी, अनुष्का शर्मा हिनं कला क्षेत्रातून पदवी शिक्षण घेत, अर्थशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
रोहित शर्माची पत्नी पदवीधर असून ती एक इव्हेंट मॅनेजर आहे.
जसप्रीत बुमराहची पत्नी, संजना गणेशन ही अँकर असून, तिनं कंप्यूटर सायन्समध्ये बीटेक शिक्षण घेतलं आहे.
मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिनं कोलकात्यातून पदवी शिक्षण घेतलं आहे.
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी हिनं औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेंडुलकर ही एक प्रख्यात डॉक्टर आहे.