India vs England Test Series : इंग्लंड दौरा, कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड ( England ) दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीसाठी ( Test Series ) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. (India vs England Test Series )  

Updated: Jan 20, 2021, 07:56 AM IST
India vs England Test Series : इंग्लंड दौरा, कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा   title=

मुंबई : इंग्लंड ( England ) दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीसाठी ( Test Series ) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. (India vs England Test Series ) कॅप्टन विराट कोहलीसह हार्दिक पंड्या, इशांत शर्माचं संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील दिग्विजयी संघात मोठे बदल करण्यात आलेले नाही. 

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका (Chennai) 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, कसोटी क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा चेन्नईच्या चेपक मैदानावर दिसणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या 18 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाची कमान सांभाळेल. इशांत शर्मा आणि हार्दिक पांड्या पुन्हा संघात पुनरागमन करत आहेत. त्याचबरोबर पृथ्वी शॉ, टी नटराजन आणि नवदीप सैनी यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली. 32 वर्षानंतर भारताने 2-1ने कसोटी मालिका जिंकली. असे असले तरी टीम इंडियासाठी पुढचे आव्हान असणार आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

इशांत शर्माने फेब्रुवारी 2020 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते.  2018 नंतर हार्दिक पांड्याचं कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.