सेंच्युरिअन : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडियाने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या टीमने एक ओव्हर शिल्लक असतानाच गाठलं. दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या या विजयामुळे तीन मॅचेसची सीरिज १-१ ने बरोबरीत आली आहे. आता शेवटची आणि तिसरी मॅच निर्णायक ठरणार आहे. म्हणजेच तिसरी मॅच जिंकणारी टीम सीरिज आपल्या नावावर करेल.
मॅचच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये १८८ रन्स केले.
टीम इंडियाकडून मनीष पांडेने ७९ रन्स आणि महेंद्रसिंग धोनीने ५२ रन्सची इनिंग खेळली. अशा प्रकारे टीम इंडियाने ४ विकेट्स गमावत १८८ रन्स करत आफ्रिकेसमोर १८९ रन्सचं आव्हान ठेवलं.
दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन आणि कॅप्टन जेपी ड्यूमिनी यांनी खेळलेल्या जबरदस्त इनिंगमुळे आफ्रिकन टीमला सहज विजय मिळवता आला. क्लासेनने ३० बॉल्समध्ये ६९ रन्स आणि जेपी ड्यूमिनीने ४० बॉल्समध्ये ६४ रन्सची इनिंग खेळली. क्लासेनने २२ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली.