IndvsNz 2nd ODI :पावसातही खेळवता येऊ शकते मॅच; भारतीय ओपनर Shubman Gill ने काढला तोडगा!

पावसातही खेळ होऊ शकतो यावर टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) याने एक उपाय सुचवला आहे.

Updated: Nov 27, 2022, 08:43 PM IST
IndvsNz 2nd ODI :पावसातही खेळवता येऊ शकते मॅच; भारतीय ओपनर Shubman Gill ने काढला तोडगा! title=

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) चाहत्यांना क्रिकेटपेक्षा पाऊसच जास्त पहायला मिळालाय. दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सिरीजच्या (India vs New Zealand 2nd ODI) दुसऱ्या सामन्यात पावसाने खेळ केल्याने सामना रद्द करावा लागला. यामुळे चाहत्यांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडलंय. अशातच पावसातही खेळ होऊ शकतो यावर टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) याने एक उपाय सुचवला आहे.

शुभमन गिलला असं वाटतं की, पाऊस हा क्रिकेट खेळाडू तसंच क्रिकेट चाहते या दोघांसाठीही समस्या ठरतो. त्यामुळे अशा परिस्थितीत छत असणाऱ्या स्टेडियमचा विचार करणं चुकीचा पर्याय ठरणार नाही.

न्यूझीलंड विरूद्ध व्हाईट बॉस सिरीजच्या 6 सामन्यांमध्ये 2 सामने पावसाने रद्द झाले. तर एक सामना डकवर्थ-लुईसच्या नियमांनुसार समाप्त झाला. शुभमनने पहिल्या सामन्यात 50 रन्स केले होते तर आजच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद 45 रन्स केलेत.

आजचा सामना पावसाने रद्द झाल्यानंतर शुभमन गिल म्हणाला, इनडोर स्टेडियममध्ये खेळण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागेल. एक खेळाडू आणि चाहता म्हणून पावसामुळे इतके सामने प्रभावित झालेलं पाहणं अस्वस्थ करणारं आहे. पण हा एक मोठा निर्णय असल्याने मी याबाबत कशी भूमिका घ्यावी याची मला कल्पना नाही. सामन्यादरम्यान पाऊस आला तर बंद छत असणाऱ्या स्टेडियमचा पर्याय चांगला ठरू शकतो. 

दुसरी वनडे पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. (Team India) आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला खरा पण दोन वेळा पावसानं हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्यानं आणि किमान 20 ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्यानं शेवटी ही मॅच रद्द करण्यात आली.

9 वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी  

9 वर्षांनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडने आयोजित केलेल्या वनडे मालिकेत पराभूत करण्याची संधी होती. टीम इंडियाने 2013 मध्ये 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-1 ने पराभव केला होता. आता 30 नोव्हेंबरला होणारी तिसरी वनडे भारताने जिंकली तर मालिका 1-1अशी बरोबरीत संपेल. त्याचबरोबर न्यूझीलंडला मालिका जिंकण्याची संधी आहे.