भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jan 17, 2019, 02:12 PM IST
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा title=

वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये मिचेल सॅण्टनर, टॉम लेथम आणि कॉलीन डि ग्रॅण्डहोम या ३ खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. दोन्ही टीममध्ये २३ जानेवारीपासून ५ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. यानंतर भारत-न्यूझीलंड ३ टी-२० मॅचची सीरिजही खेळेल. भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियात वनडे सीरिज खेळत आहे. भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला होणार आहे.

न्यूझीलंडची टीम गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकतच न्यूझीलंडनं पाकिस्तानला वनडे सीरिजमध्ये ३-०नं हरवलं आहे. एवढच नाही तर न्यूझीलंडनं टेस्ट सीरिजमध्येही पाकिस्तान आणि श्रीलंकेला धूळ चारली. त्यामुळे न्यूझीलंड आणि भारतामधली वनडे सीरिज रोमांचक होईल, असा अंदाज आहे.

पाकिस्तानला पराभूत केलेल्या टीममध्ये न्यूझीलंडनं २ बदल केले आहेत. डावखुरा स्पिनर मिचेल सॅण्टनरला टीममध्ये परत बोलावलं आहे. सॅण्टनर तळाला चांगली बॅटिंगही करू शकतो. १० महिन्यानंतर सॅण्टनर न्यूझीलंडच्या टीममध्ये पुनरागमन करत आहे. गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो मैदानाबाहेर होता.

बॅट्समनच्या यादीत टॉम लेथम आणि ऑलराऊंडर कॉलीन डि ग्रॅण्डहोम यांचं पुनरागमन झालं आहे. या दोघांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आराम देण्यात आला होता. ऑलराऊंडर जेम्स निशाम आणि लेग स्पिनर टॉड एस्टल यांची टीममध्ये निवड झालेली नाही. दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजवेळी दुखापतग्रस्त झाले होते.

न्यूझीलंडची वनडे टीम

केन विलियमसन (कर्णधार), ट्रेण्ट बोल्ट, डग ब्रेसवेल, रॉस टेलर, कॉलीन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्यूसन, मार्टीन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लेथम, कॉलीन मुन्रो, हेनरी निकोल्स, मिचेल सॅण्टनर, ईश सोदी, टीम साऊदी

भारताची वनडे टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, शुभमन गिल, एमएस धोनी, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

२३ जानेवारी- पहिली वनडे- नेपियर

२६ जानेवारी- दुसरी वनडे- माऊंट मोऊनगुई

२८ जानेवारी- तिसरी वनडे- माऊंट मोऊनगुई

३१ जानेवारी- चौथी वनडे- हॅमिल्टन

३ फेब्रुवारी- पाचवी वनडे- वेलिंग्टन

६ फेब्रुवारी- पहिली टी-२०- वेलिंग्टन

८ फेब्रुवारी- दुसरी टी-२०- ऑकलंड

१० फेब्रुवारी- तिसरी टी-२०- हॅमिल्टन