INDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स

दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 22, 2018, 02:41 PM IST
INDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स title=
Image: BCCI

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

मनीष पांडे आणि धोनीने टीमला सावरलं

भारतीय टीममधील विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा हे लवकरच आऊट झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मनीष पांडे आणि धोनीने टीमला सावरलं.

मनीष पांडे-धोनीने केले रेकॉर्ड्स

टीम इंडियातर्फे मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी तुफानी इनिंग खेळली. यासोबतच त्यांनी अनेक रेकॉर्ड्स केले.

मनीष पांडेने ४८ बॉल्समध्ये ७९ रन्सची इनिंग खेळली. तर, महेंद्र सिंग धोनी यांनी २८ बॉल्समध्ये ५२ रन्सची इनिंग खेळली. मनीष पांडेने ३३ बॉल्समध्येच आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली तर धोनीने २७ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली.

पाचव्या विकेटसाठी चौथी मोठी पार्टनरशिप 

महेंद्र सिंग धोनी आणि मनीष पांडे यांनी पाचव्या विकेटसाठी चौथी सर्वात मोठी पार्टनरशिप केली आहे. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ९८ रन्स जोडले. टी-२० मध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप शोएब मलिक आणि मिसबाह उल हक यांच्या नावावर आहे. दोघांनीही २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात ११९ रन्सची पार्टनरशिप केली होती.

दुसरी सर्वात मोठी पार्टनरशिप युवराज सिंग आणि धोनी यांच्या नावावर आहे. त्यांनी २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरोधात १०२ रन्सची इनिंग खेळली होती. तर, तिसरी पार्टनरशिप पॉल कॉलिंगवुड आणि औवेस शाहने २००८ मध्ये न्यूझीलंड विरोधात पाचव्या विकेटसाठी १०२ रन्स केले होते.

धोनीची सर्वात जलद दुसरी हाफ सेंच्युरी

महेंद्र सिंग धोनीने या मॅचमध्ये २७ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने सर्वात जलद हाफ सेंच्युरी केली आहे. यापूर्वी धोनीने २०११ मध्ये इंग्लंड विरोधात वन-डे मॅचमध्ये २६ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली होती. 

या मॅचमध्ये मनीष पांडेने ४८ बॉल्समध्ये ७९ रन्स बनवले. यामध्ये ६ फोर आणि ३ सिक्सरचा समावेश आहे. यापूर्वी मनीष पांडेने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमकडून २००९ साली खेळताना डेक्कन चार्जर्स विरोधात ७३ बॉल्समध्ये ११४ रन्स केले होते.