IPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 7, 2018, 04:29 PM IST
IPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का title=
Image: IANS

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो.

या टीम्सने केलं चांगलं प्रदर्शन

ज्या टीम्सने आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे त्या टीम्सचं ब्रँड व्हॅल्यूही तितक्याच पटीने वाढलं आहे. १० वर्षांमध्ये सर्वात यशस्वी टीम्समध्ये चेन्नई, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे.

'ही' टीम सर्वात यशस्वी

आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर मुंबई सर्वात यशस्वी टीम ठरली आहे. मुंबई इंडियन्सने ३ वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे तर चेन्नईने दोन वेळा.

जाणून घ्या एका रनची किंमत

ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये रन्सचा पाऊस पाडला आहे त्यांच्यावर तितक्याच कोटींची बोली लागणं स्वाभाविक होतं. मात्र, आयपीएलमध्ये एका रनची किंमत २२१०९१ आहे. गेल्या १० वर्षांच्या प्रावासात आयपीएलच्या फ्रँचायजीने खेळाडूंच्या सॅलरीवर ४२.८४ अरब रुपये खर्च केले आहेत. या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये १,९३,७७३ रन्स बनले. म्हणजेच एका रनसाठी २,२१,०९१ रुपये.

IPLमध्ये खेळाडूंवर किती खर्च

गेल्या १० वर्षांमध्ये आयपीएलमध्ये ६९४ खेळाडूंवर ४२८४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये ४२६ भारतीय खेळाडूंवर २३५४ कोटी रुपये खर्च झाले. २६८ विदेशी खेळाडूंवर १९३० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

आतापर्यंत १० सीजनमध्ये ५३७ मॅचेस खेळण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत १,९३,७७३ रन्स बनले तर, ७,४१६ विकेट्स घेण्यात आले आणि २४,२०८ ओव्हर्स खेळण्यात आल्या आहेत.