आयपीएल ११ : ३ ट्रॉफी जिंकलेल्या मुंबईसाठी कठीण सामना

 दुसरीकडे पंजाबची टीम जबरदस्त फॉर्मात आहे. यावेळच्या विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

Updated: May 4, 2018, 08:31 AM IST
आयपीएल ११ : ३ ट्रॉफी जिंकलेल्या मुंबईसाठी कठीण सामना title=

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ट्रॉफी जिंकलेल्या मुंबईसाठी ११ वे सत्र खूप कठीण चाललय. आज होळकर क्रिकेट मैदानात मुंबईचा सामना पंजाबच्या टीमसोबत आहे. स्टार खेळाडूंचा भरणा असलेली मुंबई गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला शिल्लक सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे पंजाबची टीम जबरदस्त फॉर्मात आहे. यावेळच्या विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. ७ पैकी ५ सामने जिंकत १० गुणांसह पंजाबची टीम तिसऱ्या स्थानावर आहे.

मुंबईची बॅटींग फ्लॉप 

 या सीझनमध्ये मुंबईची बॅटींग फ्लॉप ठरतेय. कॅप्टन रोहित शर्माची बॅट एक-दोन मॅचमध्येच तळपली सुर्यकुमार यादव यानेच रन्स बनविण्यास सातत्य राखलय. त्यान ८ मॅचमध्ये २८३ रन्स बनविले. त्यानंतर कोणता बॅट्समन चांगली धावसंख्या उभा करु शकला नाही. रोहित शर्मा ६ मॅचमध्ये २० चा आकडा पार केला नाही. मुंबईचा तुफान फलंदाज केरन पोलार्डची बॅटही शांतच आहे. त्याने आतापर्यंत ७६ रन्सच केले आहेत. 

मयांकवर भिस्त 

बॉलिंगमध्येही मुंबईची कामगिरी फारशी चांगली होत नाहीए. बॉलिंगची भिस्त आता मयांक मर्कंडेवर आहे. लेग स्पिनर मयांकने ८ मॅचमध्ये ११ विकेट घेतले. याला बॅटींग करण बॅट्समनना कठीण जाईल. याशिवाय बुमराह, मिशेल मॅक्लेघन आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यावरही मोठी मदार असणार आहे. 

पंजाब फॉर्मात 

 बॅट, बॉल आणि फिल्ड तिघातही टीम पंजाब चांगले प्रदर्शन करतेय.  ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांची  सलामी जोडीच पंजाबच्या विजयाची शिल्पकार बनतेय. राहुलने ७ मॅचमध्ये २६८ रन्स बनविले. गेलने फक्त ४ मॅचमध्ये २५२ रन्स बनविले. यामध्ये एक शानदार शतकाचाही समावेश आहे.