close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IPL 2019: मुंबईचा 'मेंटर' सचिनची दिल्लीच्या उभरत्या खेळाडूला डिनर पार्टी

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे.

Updated: Apr 18, 2019, 04:54 PM IST
IPL 2019: मुंबईचा 'मेंटर' सचिनची दिल्लीच्या उभरत्या खेळाडूला डिनर पार्टी

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानामध्ये रात्री ८ वाजता मॅचला सुरुवात होईल. याआधी मुंबईत झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने रोहित शर्माच्या टीमला पराभवाची धूळ चारली होती. आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. पण या मॅचच्या आदल्या दिवशी मुंबईचा मेंटर सचिन तेंडुलकरने दिल्लीचा खेळाडू पृथ्वी शॉला डिनरला बोलावलं.

सचिन तेंडुलकरसोबत जेवण करणं हे पृथ्वी शॉसाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. पृथ्वी शॉने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पृथ्वी शॉ हा सचिनचा फॅन आहे, तर सचिनलाही पृथ्वीची बॅटिंग आवडते. अनेकवेळा सचिन तेंडुलकरने पृथ्वीला बॅटिंगच्या टिप्सही दिल्या आहेत.

सचिनसोबतच्या डिनरचा फोटो शेअर करताना पृथ्वी शॉ म्हणाला, 'शानदार डिनर, थॅन्क्यू सचिन सर. तुम्हाला भेटल्यानंतर नेहमीच आनंद होतो.'

मुंबईकर सचिन-पृथ्वी

पृथ्वी शॉ जरी आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळत असला, तरी तो स्थानिक आणि रणजी क्रिकेट मुंबईतूनच खेळतो. तर सचिनच्या क्रिकेटची जन्मभूमी ही मुंबईच होती. मागच्यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमधून पृथ्वी शॉने टेस्ट कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच टेस्ट इनिंगमध्ये शॉने शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे शॉला टेस्ट सीरिजला मुकावं लागलं होतं.

शॉच्या नेतृ्त्वात अंडर-१९ वर्ल्ड कप विजय

पृथ्वी शॉच्या नेतृ्त्वात भारताने २०१८ साली अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर शॉसह त्या टीममधल्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये मोठी बोली लागली होती. शॉने मागच्या मोसमात काही चांगल्या खेळी केल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वी शॉचं शतक एक रनने हुकलं.