IPL 2021: पृथ्वी शॉ आणि KKRच्या बॉलरची जिगरी दोस्ती! सामन्यानंतर व्हिडीओ आला समोर

 6 बॉलवर 6 चौकार! सामन्यानंतर या बॉलरनं घेतला पृथ्वी शॉचा बदला

Updated: Apr 30, 2021, 01:48 PM IST
IPL 2021: पृथ्वी शॉ आणि KKRच्या बॉलरची जिगरी दोस्ती! सामन्यानंतर व्हिडीओ आला समोर title=

मुंबई: दोन भाऊ-भाऊ एकमेकांविरोधात IPLमध्ये खेळताना दिसले पण जिगरी दोस्त जेव्हा एकमेकांविरुद्ध सामना खेळतात आणि त्यानंतर सामना संपल्यावर कसे एकमेकांसोबत मजा मस्करी करतात त्याचं उत्तम उदाहरण एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. कोलकाता  विरुद्ध झालेल्या सामन्यात 7 विकेटसनं दिल्ली संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

या विजयात पृथ्वी शॉचा मोठा वाटा आहे. कोलकाताचा गोलंदाज शिवम मावीच्या गोलंदाजीदरम्यान पृथ्वीने पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चौकार ठोकले. त्याच्या तुफान फलंदाजीमुळे पहिल्या ओव्हरमध्ये दिल्ली संघाला 25 धावा मिळाल्या. पृथ्वी शॉ आणि शिवम मावी याआधी एकत्र खेळले आहेत. त्यामुळे त्याची स्टाईल पृथ्वीसाठी नवखी नव्हती. टीमला जिंकवणं हे एकमेव ध्येय डोक्यात होतं असंही पृथ्वी त्यावेळी म्हणाला. 

सामन्यात पृथ्वी शॉनं शिवमच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा घेतल्या आणि कोलकाता संघातील खेळाडूंना चक्रावून सोडलं. तर सामना संपल्यानंतर शिवम मावीने पृथ्वी शॉची मान धरत त्याचा बदला घेतल्याचं दिसत आहे. शिवम मावी आणि पृथ्वी शॉ खूप खास अगदी जिगरी दोस्त आहेत.

शिवमने पृथ्वी शॉसोबत सामन्यानंतर मस्करी करत त्याची मान धरल्याचा व्हिडीओ आयपीएलने ट्वीट केला आहे. एकदा सामना संपला की पुन्हा मैत्री आणि त्यातला गमतीजमती दिसतात हीच या आयपीएलमधील मजेची गोष्ट आहे असं कॅप्शनही दिलं आहे. 

IPL 2021 RR vs MI : पोलार्डच्या बॅट ऐवजी हेल्मेटवर आपटला बॉल अन् थेट गेला चौकार, व्हिडीओ

दिल्ली संघाने राजस्थान, बंगळुरू असे दोन सामने आतापर्यंत गमावले आहेत. तर चेन्नई विरुद्ध 7 विकेट्सने, पंजाब विरुद्ध 6 विकेट्सनं मुंबई विरुद्ध 6 विकेट्सनं हैदराबाद विरुद्ध सुपरओव्हर खेळून दिल्लीने विजय मिळवला होता. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात केवळ 1 रनसाठी सामना हातून निसटला. त्यानंतर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत 7 विकेट्सनं दिल्लीनं कोलकाता विरुद्ध झालेला सामना जिंकला आहे.