IPL 2021 | Rajasthan Royalsला मोठा झटका, स्टार खेळाडूची उर्वरित सामन्यातून माघार

दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीआधी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Jun 22, 2021, 10:24 PM IST
IPL 2021 | Rajasthan Royalsला मोठा झटका, स्टार खेळाडूची उर्वरित सामन्यातून माघार

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. कोरोनामुळे ऐनवेळेस आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. परिणामी या उर्वरित  31 सामन्यांचे आयोजन हे 19 सप्टेंबर किंवा त्यानंतर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीआधी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या स्टार खेळाडूने या उर्वरित मोसमातून माघार घेतली आहे. जॉस बटलरने (Jos Buttler) उर्वरित मोसमातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थानसाठी हा मोठा झटका आहे. (ipl 2021 rajasthan royals star batsman jos buttler ruled out of remaining season in uae)

जॉस या 14 व्या मोसमात चांगली कामगिरी करत होता. बटलरने या 14 व्या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 153.01 च्या स्ट्राईक रेटने आणि 36.28 च्या सरासरीने 1 शानदार शतकासह  254 धावा केल्या होत्या. बटलरने  या मोसमात 124 धावांची शतकी खेळी केली होती. ही खेळी बटलरच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

बटलर राजस्थानकडून सलामीला खेळायचा. दरम्यान आता बटलरने माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थान या उर्वरित सामन्यांमध्ये सलामीला कोणाला पाठवणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. राजस्थानने हा 14 वा मोसम स्थगित होण्यापर्यंत एकूण  7 सामने खेळले होते. त्यापैकी 3 सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. तर  4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान 6 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.  

संबंधित बातम्या :

ICC WTC Final: भर मैदानात Mohammed Shami असा आली की, सर्वांना हसू अनावर

WTC Final | उडता गिल! Shubaman चा जबरदस्त कॅच, Ross Taylor माघारी