IPL 2021 RCB vs DC: पराभवानंतर पंत झाला भावुक, कोहलीनं डोक्यावरून फिरवला हात, व्हिडीओ

युजवेंद्र चहल आणि कोहलीने हताश आणि निराश झालेल्या ऋषभ पंतला सहानभुती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Apr 28, 2021, 10:02 AM IST
IPL 2021 RCB vs DC: पराभवानंतर पंत झाला भावुक, कोहलीनं डोक्यावरून फिरवला हात, व्हिडीओ title=

मुंबई: बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कोहली सेनेनं एका रनने विजय मिळवला आहे. या विजयाचं सेलिब्रेशनं एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ करत होता. तर दुसरीकडे अत्यंत निराश आणि हताश झालेल्या दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत मैदानातून जात असल्याचं पाहायला मिळालं. 

सामना जिंकता जिंकता हरल्याचं दु:ख अधिक झालं आहे. या सामन्यानंतर एक भावुक करणाऱ्या क्षणाचा व्हिडीओ IPLने आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पंत निराश होऊन जात असताना मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि विराट कोहली त्याची पाठ थोपटत आहेत. त्याला धीर देत आहेत. 

या व्हिडीओमध्ये कोहली पंतच्या डोक्यावरून हात फिरवताना देखील दिसत आहे. तो बराचवेळ पंत शेजारी उभं राहून खेळाडूंशी बोलताना देखील दिसत आहे. दिल्लीने गमवालेल्या सामन्यानंतर पंत खूप निराश झाला. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून कोहलीने हात फिरवला आहे. हा भावुक क्षण कॅमेऱ्या कैद झाला. 

अनेकदा मैदानात चिडलेला किंग कोहली पाहिला आहे. वैतागलेल्या कोहलीने खुर्चीची तोडफोड केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. मात्र कोहलीचं वेगळेपण दाखवणारा हा व्हिडीओ खूपच भावुक करणारा आहे. 

सामन्यानंतर ऋषभ पंत काय म्हणाला ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

दिल्ली संघाने 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना  ऋषभ पंतने 58 धावा केल्या. शिमरोनने 53 आणि पृथ्वी शॉने 21 धावांची खेळी केली आहे. शिखर धवन 6 धावा करून तंबुत परतला तर स्टिव स्मिथची बॅटची 4 धावांच्या पुढे चालू शकली नाही. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल आणि ए बी डिव्हिलियर्सने मिळून दिल्लीचे 4 गडी बाद केले. त्यांना 20 ओव्हरमध्ये 170 धावा करता आल्या एक एक दोन धावांच्या फरकानं सामना हातातून निसटल्याचं पाहायला मिळालं आहे.