IPL 2021 RR vs RCB : अर्धशतक पूर्ण होताच मैदानातून विराटनं कोणाला दिलं Flying Kiss? व्हिडीओ

RCBचा कर्णधार विराट कोहलीनं आपलं पहिलं अर्धशतक आपल्या मुलीला समर्पित केलं आहे.

Updated: Apr 23, 2021, 10:06 AM IST
IPL 2021 RR vs RCB : अर्धशतक पूर्ण होताच मैदानातून विराटनं कोणाला दिलं Flying Kiss? व्हिडीओ title=

मुंबई: IPLच्या या चौदाव्या हंगामात विराटसेनेची गाडी सुसाट जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोहलीच्या संघाने म्हणजेच आरसीबीने विजयाचा चौकार मारला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात 10 गडी राखून एकहाती विजय मिळवला आहे. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या दोघांनी मिळून राजस्थानच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. 

कर्णधार विराट कोहलीचं iplच्या या हंगामात पहिलं अर्धशतक केलं आहे. हे अर्धशतक झाल्यानंतर त्याने मैदानातून प्लाइंग किस्स दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने प्लाइंग किस्स कोणाला दिलं याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

कर्णधार विराट कोहलीनं हे प्लाइंग किस त्याच्या मुलीला म्हणजेच वामिकाला दिलं आहे. त्याने आपलं यंदाच्या सीझनमधील पहिलं अर्धशतक वामिकाला समर्पित केलं आहे. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीनं वानखेडे स्टेडियमवर तुफान आणलं.

देवदत्तनं 102 धावांची शतकी खेळी केली. तर कोहलीने 72 धावा केल्या आणि राजस्थाननं दिलेलं लक्ष्य भेदून चौथा विजयही खिशात घातला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची गाडी सुसाट आहे. आतापर्यंत सलग चारही सामने ते जिंकले आहेत.